जय गणेशा ! बुध्दिदाता
(चाल: यहाँ वहाँ कहाँ भी...)
जय गणेशा ! बुध्दिदाता । दुःख सर्वहि वारि माझे llधृ॥
प्रथम घेई जो नाम तुझे प्रभु । करिशि मनोरथ पूर्ण तयाचे ।
रिद्धिसिध्दी चौरि डुलविती, मूषक वाहन तुजला साजे।।१॥
सर्वहि ऋषिमुनि तुजला स्मरती, नाम तुला गजवदन विराजे।
कोटी सूर्य-से तेज पडे जरि,मुकुट रत्नमय,नूपुर वाजे ।।२॥
येई धावत गिरजा-सूता ! नमन करि मी दीन आता ।
ठेवो तुकड्या चरणी माथा, आडकोजी ! धाव काजे ।।३ll