गजवदन नाम हे जया,
(चालः नरजन्म मिळोनी तुला...)
गजवदन नाम हे जया, शरण मी तया, नमिन साष्टांगे ।
रे पार्वती-शंकर-सुता ! धाव गा वेगे ॥धृ०॥
तव स्वरुप पाहुनि अता, रुप मनि ध्याता वृत्ती वळली ।
त्या प्रेमाची ती दुर्वा मम शिरी पडली ।।
हे विघ्ननिवारक हरी ! दु:ख दुर करी पाच विषयांचे ।
हे नकळे मजला ज्ञान स्वरूप पाहण्याचे ॥१॥
झळकतसे बेंबी हिरा, मुकुट तो बरा रत्नमय खासा ।
मनि हीच असे गा इच्छा, देइ निवासा ।।
तो अंकित तुकड्यादास, उध्दरी त्यास गणपती देवा !
हा भक्त दुष्ट जरि झाला, पाहि न भावा ॥२॥