तव धन्य भाग्य हे मारुति ! जन्मा आला
(चाल: कशि फिरली हरीची मर्जि...)
तव धन्य भाग्य हे मारुति ! जन्मा आला ।
होऊनि दास रामाचा, संकटि झटला ।।धृ०।।
अघटीत करुनिया करणि शोध लावियला ।
शोधोनि सीता ती लंकेवरि चालियला ।|१।।
बहु राक्षस वधुनी बुडवियले लंकेला ।
पाळूनी ब्रह्मचर्याते, सेतुहि केला ।।२॥
तो तुकड्या बालक बिडीमधे रत झाला ।
तारी रे ! काढूनी भवी खास तो बुडला ।।३।।