शोध घेई रे ! अमोल ही काया ।

(चालः अरे हरि प्यालो..)
शोध घेई रे ! अमोल ही काया ।
धाडिशी व्यर्थ उगी वाया ।।धृ०।।
कसा आनंद, नच ठावा तुजला , विनाशी मायेला भूलला ।
समज अंतरी बघ रे! अपुल्याला, उलट कर समजुनि नेत्राला ।
पाहि भोवती, हरी क्षणिक   माया ||धाडिशी0।|१॥
संत-सेवेचा, लाभ कसा घ्यावा ? मिळेना श्रध्देविण रावा ।
कनक देउनी, मागिल जरि ठेवा, तरि ना मिळे लाभ बरवा ।
कृपेवाचुनी, जन्म व्यर्थ गेले, तेचि नर जिते न का मेले ? ।
सहज ये दया, धरिता निट पाया ।। धाडिशी 0 ।।२ll
करी साधन, समजुनिया काही, कशाला बुडतो मृग -डोही ?
असुनि सादर, अज्ञ ज्ञान नाही,जीव तो पाडिशी -भव- डोही ।
धीर धरवेना, तुकड्या लीन राही, देई तो ठाव गुरु पायी ।
हेचि   मागणे, असो   गुरु    पाया ॥ धाडिशी0 ।l३ll