काय वर्णु थोरवी गुरुची, मज आनंदविले !

(चालः कसा निभवशी काळ..)
काय वर्णु थोरवी गुरुची, मज आनंदविले !
स्वप्न-सुखाला विनाश जाणुनि, अपरोक्षी डोले ।।धृ०।।
शोध गड्या ! तूं नित्य अता तरि, होई सावध ।
सोहं   मंत्रा   घे   पटवोनी,   हाचि   तुला    बोध ॥१॥
मायावी हे त्रिगूण जाणी, नसे सत्यरुप ।
चिन्मय ज्योती पाहि गड्या रे ! दिसे आपि आप ।।२।।
करुनी मन हे स्थीर, द्वेत-भावना सोडुनीया ।
शून्य रुपी त्या लाव समाधी, धरुनी   गुरु - पाया ॥३॥
चौथा देह शोधुनी पाही, कैसे ते नवल ।
अधो- ऊर्ध्व अणि शून्य-महाशून्यात ज्स बाल ।।४।l
जो जाणे तो देहिच मरतो, आत्म-सुखी लोळे ।
स्वप्न सुखाला विनाश जाणुनि, अपरोक्षी डोले ।।५।।
नसे पाच मुद्रेचा थाकचि, उलटुनि आकाशी ।
सांगे तुकड्यादास-गुरु बा ! ओळखि अपुल्यासी ।।६॥