तारक तू सकला स्वामी ! वससी अक्कलकोटी ।
(चालः कसा निभवशी काळ..)
तारक तू सकला स्वामी ! वससी अक्कलकोटी ।
आलासे अवतरुनि जगी या निजभक्तांसाठी ।।धृ०।।
वर्णु काय महिमान तुझे मी ? वेदांच्या पार ।
नेति - नेति ओरडती ते की, नच तुमचा थार ।।१।।
अनंत नामी वर्णिति तुम्हा, गणति न कोणि करी ।
त्वरित तरे भवसागरि नामे, असला पापी जरी ।।२॥
अंकित तुकड्यादास गुरुचा, शरण तुझे पायी ।
देई ठाव गा ! चरणी आता मजला लवलाही ।।३।।