जरुर का मज जगाची हो !
(चाल: मनाला स्थीर करवाया...)
जरुर का मज जगाची हो ! करिन धावाचि श्रीहरिचा ।।धृ०।।
बहू फिरलो भटकलो मी सदां सागर-पहाडी ही ।
गुरु तो ना मिळे मजसी, दावण्या मार्ग मोक्षाचा ॥१॥
गहन केली व्रते सारी, भेटि देईल म्हणुनीया ।
वर्षे सत्राहि खोवियली, न पत्ता अजुनि पै याचा ।।२।।
करी कुणी याग-योगांग, दाविती कुणि सदा ढोंग ।
वाढवोनी जटा - दाढी, न फुटला पाझर प्रेमाचा ॥३॥
जाणण्या स्वरुप ते त्याचे, नसे ब्रह्मादिका छाती ।
म्हणे तुकड्या हरि-स्मरणी सदा गुण गात हो नाचा ॥४॥