अद्वैतरुप ज्याचे, ते स्वामि जाण साचे ।

(चाल: सबके लिये खुला है..)
अद्वैतरुप ज्याचे, ते स्वामि जाण साचे ।
अपरोक्ष ज्ञान ज्याला, ते भाग्य साधकाचे ।।धृ०॥
सोडूनि सुख-दुःख, स्त्री-मायबाप देख ।
होई   त्वरे   सेवक, वद   नाव   त्या   गुरुचे ॥१॥
श्रेष्ठ नाहि रे ! आणिक, घेइ घेइ सत्य भाक ।
बोले पार्वती - नायक स्मर रात्रं - दिन वाचे ॥२।।
चांगदेव योगि मोठा, करि घेइ शेष- सोटा ।
ज्ञानेश सांगे वाटा, हे    वचन   रे !   ग्रंथाचे ॥३॥
सदगुरुच वेद जाणी, रमवाच नामि वाणी ।
लोकी मरा करोनी, ऋषि वाल्मिकीहि नाचे ।|४।।
सानथोर मानि सम, वाचे दिसेल प्रेम ।
करि कर्म ते निष्काम, रुप ज्ञानमय  जयाचे ॥५॥
सांडोनी आशा तृष्णा, पाषाणा फोडि पान्हा ।
नाचे द्वारकेचा कान्हा, अगणीत भक्त त्याचे ॥६॥
नाव आडकोजी गुरु, सत्य साधकासि तारु ।
स्मरता करीत पारु, तुकड्या स्वरुपि   नाचे ॥७॥