सदगुरु - चरणी दृढ भावाने जाशि
(चाल: पतीतपावन नाम ऐकुनी..)
सदगुरु-चरणी दृढ भावाने जाशि शरण तू रे !
कृपा करिल मग सदगुरुराजा, भवसागरि तारे ॥धृ०॥
तन-मन-धनि मम सदगुरु वसला, ऐसा दृढ भाव ।
तारक मम जिवनाचा तो हो ! श्रेष्ठ नाहि देव ॥१॥
मायबाप अजि ! गोत सर्वही, न मानेचि काही ।
सखा सदगुरु तारिल मजला, भाव हाचि पाही ।।२॥
सतशिष्याचे असेचि लक्षण, जाणा लवलाही ।
अंकित तुकड्या धरुनि नम्रता मागे हे पायी ।।३॥