ऐक रे ! माझे मना ! तू का भटकसी

(चाल: सावळ्या ! ये निर्मला बा..)
ऐक रे ! माझे मना ! तू का भटकसी व्यर्थची ।
धावुनी यम मारि तडतड, प्राण घेईल त्वरितची ॥धृ०ll
ना दया,येईल कुणाला,कीर्ति न कुणी करी तुझी ।
राम जव घेशील हृदयी,   सहज   तरसी, घे  रुची ॥१॥
रामनामे बहुत तरले, शास्त्रांतरिही भरुनि उरले ।
अवयव ज्यांचे रामे भरले, काया झाली  सुवर्णची l।२।।
सांगतशे मी तुला मना रे ! लीनपणे धर गुरु-चरणा रे !
तुकड्यादास आस ही मागे, नित्य नाम स्मरणाची ॥३॥