गुरु-कृपेला ज्ञान हवे, तव सतसंगति साधा
(चालः कसा निभवशी काळ...)
गुरु-कृपेला ज्ञान हवे, तव सतसंगति साधा ।
सतसंगतिविण न कळे कोणा, जन करिती बाधा ।।धृ०।।
शास्त्र-पुराणे ऐकुनि श्रवणी, हाचि धरा फंदा ।
सदगुरु-वचनाविणा भुला रे ! सर्व कामधंदा ।।१।।
ताचि खरा रे ! तोचि खरा, भव-तारक जनतेचा ।
श्रेद्धविण नच कुणा गवसला, भाव निश्चयाचा ।।२।l
तुकड्यादासा ठाव मिळाया, बहू श्रमली काया ।
आडकुजी गुरु - प्रसाद होता, आधिच ताराया ।।३॥