रमू दे चित्त हारिपायी, मना का फिराण माधार ?
(चाल: अगर है गयान को पान)
रमू दे चित्त हारिपायी, मना का फिराण माधार ?
सुखाचे सोडुनी स्थळ हे, कसा घेशी विषय-चारा ? ॥ ध्रु०॥
सावळा पाहता डोळा, मनाची भूक ही जाई ।
तयाविण सुख ना कोठे, भटकता सर्व संसारा ।।१॥
विटेवरि लक्ष देतांना, तनुमना भान ना रहे
उसळती नेत्रि जल-धारा, मिळे वाटे पटी थारा ।।२॥
गळ्यामधि माळ तुळसीची, कौस्तुभहि झळकतो कंठी ।
कटावरि ठेविले कर हे, पाहता चित्त घे थारा ।I३॥
मुकुट शिरि कर्णि कुंडल ते, भक्त-गण दर्शना झुलती ।
म्हणे तुकड्या सदा डुलती, तसा घे तूहि निर्धारा ॥४।।