स्मर स्मर मना ! हरिगुण रे !
(चालः पाहि पाहि देवा देहि मानवा..)
स्मर स्मर मना ! हरिगुण रे ! ।।धृ०॥
हे जगडंबर सत्य गमे तुज, नश्वर हे जाण रे ! ।|१॥
मायबाप साथी पैशांचे, येई अंति कोण रे ! ।।२॥
सदा राहि सत्संगति धरुनी, होशिल पार त्वरे ।।३॥
कैसा तरला अजामेळ तो ? वाल्मिक गुरुच्या वरे ॥४॥ आडकुजींचा सत्संग धरी, तुकड्या वदे खुण रे ! ।।५॥