सदगुरु चे नाम सख्या ! वदत जा मुखी

(चालः मंगलमय नाम तुझे...)
 सदगुरु चे नाम सख्या ! वदत जा मुखी I
होशिल रे ! पावन तू,   राहसी   सुखी ॥धृ०।।
संत पहा अगणित ते करिति बोध रे !
अजुनि तुला गोडि नसे नाम- छंदि रे ! ॥१॥
जन्म तुला लाभला, ही नरतनू नवी ।
धरुनि चरण श्रीगुरुचे पार   हो   भवी ॥२॥
अंकित गुरुचा तुकड्या दास तो वदे ।
स्मरण नसे जे स्थळी ती जाण श्वापदे ॥३॥