गुरुविण हो ! ठाव नाही, ऐसे संत बोलती
(चाल: किति उरली वेळ..)
गुरुविण हो ! ठाव नाही, ऐसे संत बोलती ॥धृ०।।
सहा शास्त्र अठरा पुराण । चार वेद महा विद्वान ।
ब्रह्मा -विष्णु -महेश जाण । तेचि सांगती ॥१॥
चांगदेव तपी मोठा । अष्टसिध्दी ज्याचे हाता ।
तरी देवासी नावडता । कोण मानिती ? ।।२।l
श्रेष्ठ भक्त होते साचे । नामदेव नाव जयाचे ।
गोरा म्हणे तुम्ही कच्चे । ग्रंथी साक्ष ती ॥३॥
सत्य सत्य जाण पाही । गुरुविना मार्ग नाही ।
करिति साधने जी काही । तुकड्या म्हणे रिती।।४।।