गुरुविण जाण कोण तरला ? शास्त्री

(चालः प्यारे ! अपनी गठडी खोल..)
गुरुविण जाण कोण तरला ? शास्त्री-पंडित थोर भला ॥धृo॥
महान योगी - ऋषी- देव ठेविती गुरुचरणी भाव ।
जरि का तपी असे मोठा ! बसला गुरुविण त्या   सोटा ।।१॥
शास्त्र ज्या पाठ असे सगळे, गुरुविण अंतर ते न कळे ।
पुस्तकी विद्या पाठ करुन, म्हणे मी संत झालो   जाण ।।२॥
फिरसि चौर्यांशी का प्राण्या ! उपाय त्वरित करी शहाण्या !
तुकड्यादासा नेणवे हो ! ठाव   गुरु - चरणाशी   राहो ।।३॥