रे सख्या ! सांगतो तुला, भक्त तू भला

(चाल: भटकला, कितिक भटकशी..)
रे सख्या ! सांगतो तुला, भक्त तू भला, निजरुप पाही ।
जाउनिया गुरुसी शरण, तरा लवलाही ॥धृ०।।
करि विचार अपुले मनी, नित्य ते जाणि, असत्या टाकी ।
घेउनी गुरु-उपदेश, मंत्र तो घोकी ।
हा सुलभ उपायचि बरा, तुटे तो फेरा लक्षचौऱ्यांशी ।
असुनिया तूच अविनाशी भ्रमि पडलासी ।।
सांगती संत बहु हीत, दास तो नमित तुकड्या साचा ।
तनु तारायाला घेइ़ आसरा   गुरुचा ।।१।l