राहि राहि गुरु- चरणी, मनुजा !

(चालः आवडली गुरुमाय हृदया..)
राहि राहि गुरु- चरणी,  मनुजा ! ॥धृ०॥
योगयाग नेणवेच काही । धूम्रपानही नकोच तेही ।
सत्य असू दे   करणी,   मनुजा !  ॥१।।
श्रीगुरु-मुखिचा घेता मंत्र । आणिक नलगे कि यंत्रतंत्र ।
पाजिल अमृत - पाणी,   मनुजा ! ॥२।।
सर्व ऋषिमुनी गुरुने तरले । कामक्रोध या बळेच हरले ।
लाग त्वरे   तू   ध्यानी,   मनुजा ! ।।३॥
आणिक साधन नाही आता । हिंडसि का रे ! व्यर्थ तत्त्वता ?
म्हणे तुकड्या उध्दरणी,  मनुजा ! ।।४॥