संत - चरण - रज सेवा, गडे हो !
(चालः मनमोहन येणार राधिके..)
संत- चरण- रज सेवा, गडे हो ! ।।धृo।।
संत-चरण-रज महिमा अपार । न लगे वेदासीही थार ।
भज आडकुजी भावा ॥१॥
धन्य भाग्य हे त्या भूमीचे । अवतरलेसे सद्गुरु साचे ।
सत्य शोध तो घ्यावा ॥२॥
साधन साधा लक्ष्यांशाचे । जप चाले हो ! अनहत वाचे ।
साधा अजुनि तरि ठेवा ।।३॥
तुकडयादास हाचि वर मागे I दे वरखेडी ठावचि वेगे I
दास हा उध्दरावा ।।४।।