करु मी कासया चिंता ? गुरु-चरणी हे मन रमले ।
(चालः अरे ! हकदार प्यारे दिल..)
करु मी कासया चिंता ? गुरु-चरणी हे मन रमले ।
जगाचाही असा त्राता , पाजितो जी ! सदा प्याले ॥धृ0।।
चराचर करुनि निर्माण , पाहि तो रात्रही दिवसा I
धरुनिया घुंगट मायेची , आपही दावितो लीले ।।१।।
सोडुनी सर्व व्यवहारा , स्मरति जे नित्यनेमे त्या I
आत्मदृष्टी ती उघडे हो ! पुन्हा कि न या जगी आले ।।२।।
म्हणे तुकड्या गुरु-चरणी , फुका का राहतो कोणी ?
श्री आडकोजी स्वामी माझा , मी मस्तक चरणि ठेवियले।।३।।