व्हावे दीनवाणी, ऐसे वाटे कुणासी ?

(चालः झाले रामराज्य...)
व्हावे दीनवाणी, ऐसे वाटे कुणासी ?
परि हे घडे कैसे ? भाग्य येई उदयासी ॥धृ०।।
भाग्यविधाता तो सदाचारीच पावे ।
चरित्र नीतीने गाऊ त्या जीवे भावे ।|१।।
ऐसे करिता कोणी,दुःख लयाला जाई । 
जन्मोजन्मी मग सुखरुप तो  होई ॥२।।
तुकङ्यादास म्हणे, भक्ति करा हो ! ऐसी ।
मिटेल उदासी दुर्भाग्याची आपैसी ।।३॥