गुरु -कृपा ती होइल कैसी ? सांगा मज कोणी ।

(चाल: कसा निभवशी काळ..)
गुरु-कृपा ती होइल कैसी ? सांगा मज कोणी ।
काय करावे साधन त्यासी ? चुकली मन-वाणी ।।धृ०।।
देव भजू की गुरु स्मरावा ? न कळे मज काही ।
शास्त्र - मतांतर भिन्नपणाने, देती नित   ग्वाही ।।१ ।।
एकाहुनिया एक श्रेष्ठपण, दावि जनामाजी ।
काहि सुचेना काय करावे, सुखसाधन आजी ? ।।२।।
सत्संगतिचा लाभ मिळाया, फिरतो जिव माझा ।
पड् रिपु - पर्वत आड येउनी, भुलवी  गुरुराजा |।३।।
तुकड्यादासा ज्ञानांजलिचे, पाजी पद -पाणी ।
हेचि मागणे त्रिवार कथितो स्मरो स्मरण  वाणी ।।४।।