गुंग होते वेद अर्थचि लागेना

गुंग होते वेद अर्थचि लागेना । 
तेणे मते नाना पंथ झाले ।।धृ॥
बुद्धिचिया जोरे अर्थ प्रकाशला । 
शोध लावियला तत्वज्ञांनी ॥1॥
रेलगाड़ी कांही मोटारी निघाल्या । 
बिनतारी झाल्या ध्वनि-कला ॥2॥
तुकड्यादास म्हणे प्रयत्नाचे फळ । 
देव देतो बळ विकासासी ॥3॥