गर्व होऊ नये आपूलिया लोकां ।

गर्व होऊ नये आपूलिया लोकां । 
देवावरी डाका मारावया ॥धृ॥
शक्य ते करावे अशक्य सोडावे । 
बुद्धिने भरावे दिगंतर ॥1॥
कोणी म्हणे आम्ही मरण थांबवू । 
कार्य बंद ठेवू निर्सगाचे ॥2॥
तुकड्यादास म्हणे नास्तिकापर्यंत । 
लावू नये वात बुद्धिचिये ॥3॥