आधुनीक शास्त्रे वेडाविले जग ।

आधुनीक शास्त्रे वेडाविले जग । 
जिरो द्यावी रग वाटे आम्हां ॥धृ॥
कुदती भेबके विचाराच्या जोरे । 
पडती सामोरे दुःख पावे ॥1॥
वेदशास्त्रावरी न ठेवी विश्वास । 
भोगती हताश होतां दुःखे ॥2॥
तुकङ्यादास म्हणे पहावे दोन्ही ही ।
 वेद- प्रामाण्यही खोडू नये ॥3॥