समुद्राची बुडी मारी पानबुडे । एक एक काढे द्रव्य साठे ॥धृ॥

समुद्राची बुडी मारी पानबुडे । 
एक एक काढे द्रव्य साठे ॥धृ॥
भाग्याचिये बुड़ी मोति लाभविती ।
 नाहीतरी येती गोटे हाती ॥1॥
तैसा हा संसार-सागर अपार । 
दैवाने व्यवहार चाले याचा ॥2॥
तुकड्यादास म्हणे भाग्ये बुड़ी लागे । 
प्राप्त होय संगे ब्रह्मज्ञान ॥3॥