चंदनाच्या सवे बाभुळिये वास । तैसा संती दास केला संगे ॥

चंदनाच्या सवे बाभुळिये वास । 
तैसा संती दास केला संगे ॥धृ॥
प्रारब्धाचा भोग न चुके आणिका । 
ऋषि ब्रह्मादिका कोणासही ॥1॥
करोनी संगती न टिके स्वभाव । 
आधीचिये नाव पुजू लागे ॥2॥
तुकड्यादास म्हणे बहु पुण्य लागे । 
तरिच तो रंगे संतसंगी ॥3॥