जयाचे हृदय मऊ मेणाहुनी । निघे बुद्धीतुनी दयाभाव ॥
जयाचे हृदय मऊ मेणाहुनी ।
निघे बुद्धीतुनी दयाभाव ॥धृ॥
उपजता प्रेम राहे देवाकडे ।
मुळीच आवडे धर्म नीति ॥1॥
संतांचा आदर दुष्टांचा अव्हेर ।
भक्तिचा पाझार जीवभावे ॥2॥
तुकड्यादास म्हणे तोचि गुरुभक्त ।
जन्मीचे अनंत पुण्य त्याच्या ॥3॥