संगे व्याघ्र माणसाळी । कामे करतो सगळी ॥

संगे व्याघ्र माणसाळी ।
कामे करतो सगळी ॥धृ॥
तरी कां न फिरे मन ? । 
संतसंग झाल्या जाण ॥1॥
संगे पावे ब्रह्मज्ञान । 
तुटे विषय-चिंतन ॥2॥
तुकड्यादास सर्वां म्हणे । 
संग करावा सज्जने ॥3॥