संग ओळखोन करावे गमन । नाहीतरी प्राण जिवे जाय
संग ओळखोन करावे गमन ।
नाहीतरी प्राण जिवे जाय ॥धृ॥
जैसी ज्या संगती तैसी त्याची मती ।
संत हे सांगती शास्त्रामाजी ॥1॥
दुर्जनाच्या संगे सज्जनाचे वाखे ।
कदाकाळी चुके ऐसे नाही ॥2॥
तुकड्यादास म्हणे ढेंकुणाच्या संगे ।
हिरा तोहि भंगे संत बोले ॥3॥