जरि जाणे तरुणोपाय। तरि न चाले काहि उपाय
(चालः ऐकता स्वस्थ तरि काय..)
जरि जाणे तरुणोपाय। तरि न चाले काहि उपाय ॥ध0॥
करु कैसे हरि ! या काय ? श्रमविली व्यर्थ की माय ।
अजुनि तरी दावा सोय। जन्म कि हा व्यर्थचि जाय ?
निंदा स्तुति न करु वाटे ।
ते होई अधिक उफराटे ।
येति पश्चात्तापे काटे ।
धाव घालि रे रघुराया ! तरि न चले 0।।१।।
तू दयाळ का म्हणवीसी ? जाणुनि आलो तुजपासी ।
का अंत अजुनिही पाहसी ? कामक्रोध करि मज त्रासी I
म्हेणे तुकड्यादास हरी रे !
देई ठाव आडकुजी रे !
दास हा जात वाया रे !
अजुनी तरि जागृत होय। तरि न चाले0।।२॥