अजुनि तुला का न ये दया मम ?

(चाल: अपने आतम के चिंतन में..)
अजुनि तुला का न ये दया मम ? फिरता फिरता शिणलो रे ! ।
जाहिर नाम पतितपावन तव, अंत कितीतरि बघतो रे ! ॥धo॥
दे आधार त्वरित चरणाचा, तुजला आण गळ्याची रे ! ।
जग-कल्याणा अवतार तुझा, कामक्रोधि मी पिडलो रे ! ॥१॥
सकल जगाचा उद्धारक तू, सद्गुरु स्वामी आडकुजी !।
अधम पातकी तरति दर्शने, हा तव देवा !  महिमा रे !    ॥२॥
तुकड्या तो वर मागे तुजला, जन्ममरण-भय तोडी रे ! ।
नित्य असू दे सद्गुरुराया !  तव    चरणाची    गोडी   रे ! ॥३॥