श्रीगुरु आडकुजी बा ! उपेक्षा का केलिस माझी ?

(चाल: कसा निभवसी काळ..)
श्रीगुरु आडकुजी बा ! उपेक्षा का केलिस माझी ?
काय स्थिति या जगती होईल श्रीसद्गुरु ! आजी ॥धृ०॥
मज सोडावे असे जरी तुमचे अंतरि होते ।
बाळपणी का शिकवुनि विद्या चालविले माते ? ॥१॥
वय सत्रा वर्षात साहिला त्रास जगामाजी।
त्राही त्राही जिव होतो, ये  धावत   आडकुजी ! ॥२॥
तुज तुकड्या हा नमन करोनी आळवितो आई  !
वरखेडी दे वास सदा गे !   तव   पावन   पायी ।।३॥