चतुर्भूज रुप मला दावि रे हरी !
(चालः दीन के दयाल नाथ ! मेरो दुःख...)
चतुर्भूज रुप मला दावि रे हरी ! ॥धृo॥
फिर-फिरता बहू थकलो। भ्रम-चिंतेमधि फसलो ।
व्यर्थ माया- जाळि धसलो । हरि ! कृपा करी ॥१॥
कामक्रोध छळिति मला। हे उचीत का तुजला ?
अजामेळ उद्धरिला I नच दया तरी ? ॥२॥
अंत पाहसी कितीक । घेई घेई माझि भाक ।
मागणे न तुज अधीक। सोसु किति मरी ? ॥३॥
आडकोजी ! धाव त्वरे। प्राण कठि उसळति रे !
तुकड्या भव - पार करे । ठेवि की सुरी ।।४।।