तुझी प्रीत उघड करू कैसी सांग ?
(राग : खमाज, ताल : त्रिताल)
तुझी प्रीत उघड करू कैसी सांग ?
मज सुचत नाहि तव भक्ति - रंग ।
हे चंचल मन करि वृत्ति - भंग ॥धृ०॥
विषय-विकारे दुःख अती हे ।
क्षणभरि करि हे हृदय दंग ।।१॥
लहरांवरि लहरा ममतेच्या ।
याने जिव झाला नि:संग ।।२।।
सत्संगति अति दुर्मिळ झाली !
जे दिसती ते अजब ढंग ! l।३॥
कळते पण वृत्ति ना वळते
तुकड्यासी करि तू अभंग ॥४॥