तेचि खरे हो अनुभवयोगी, विषयसुखाचे निःसंगी
(चालः अपने आतम के चिंतनमे..)
तेचि खरे हो अनुभवयोगी, विषयसुखाचे निःसंगी ।।ध्रु।।
अंतर-प्रेमा जागृत ज्याचा, सदा अशाश्वत-भव भंगी ।
जग-वैभव हे न दिसे ज्याला, अस्ती भाती प्रिय रंगी l।१॥
अपुले-परके न रुचे ज्याला, विरळे स्वरुपी गुरुसंगी ।
कर्म-अकर्मी धर्म - अधर्मी, शर्म - अशर्मी नित चंगी lI२॥
एकाविण जग काहि दिसेना, जितेपणी मरणा भोगी ।
मनवाणी तल्लीन जयाची, प्रगट दिसे तृप्ती अंगी ।।३॥
मद -मत्सर हे स्वरुपी जडले, लीन तयाचे निज अंगी ।
तुकड्यादासा आस तयाची, दिसती मग इतरे ढंगी ।।४॥