करुणा करि श्री स्वामी दत्ता ! करुणा करि
(चालः लागो प्रभु ! तव छंट...)
करुणा करि श्री स्वामी दत्ता ! करुणा करि ।।धृo॥
दंड-कमंडलु, पायि खडावा, वास तटी जान्हविचे बरवा ।
पुरविसी भक्तजनांचे भावा, चरणांकित चरणी घे नाथा ! ॥१।।
भस्म शिरी करुनीया लेपा, रक्षित गो-श्वानाहि अमूपा ।
वाटत प्रेम अनूपम रुपा, ध्यानी ध्येय निरंजन त्राता l।२॥
त्रिशुलधरा ! निज,चक्रप्रहरणा! करुणाघनसुखशांत सुकरुणा ।
ज्ञानाज्ञान निरुपम ज्ञाना ! तुकड्याचा औदुंबरि माथा ।।३॥