सखया ! सोड मनाचा छंद
(चालः प्रभुविण कोण करिल भवपार..)
सखया ! सोड मनाचा छंद ।।धृ0।।
मर्कट सम वैभव हे याचे, न कधी राहि अभंग ॥१॥
कधि नेइल मन राज्य-पदाला, कधि दाविल तुरंग ।।२।।
कधि देइल बहु संपद दारा, कधि फिरवील अपंग ।।३।।
कधि करविल मन साधूसंगा, कधि विषयाचा फंद ।।४॥
कधि देइल मन स्वर्ग सुखाला, कधि नरकी करि बंद l।५॥
तुकड्यादास म्हणे हो सावध, धरि गुरुपदि आनंद ॥६॥