दावा हो मज ते घरदार
(चालः प्रभुविण कोण करिल भवपार )
दावा हो मज ते घरदार ।।ध्रु0।।
जडित जयाला पाचहि भूते, ज्यामध किल्ले चार ।।१।।
दस दरवाजे शोभति ज्याला आत तेज झकदार ।।२।।
पंखा ज्यावर ओहं सोह, त्रिकुटी संगम - धार ।।३॥
ब्रह्मा, रुद्र, विष्णु हे ज्याचे, नेमियले मुखत्यार ||४।।
सदगुरु साक्षी राज्य करी वरि, देति वेद आधार ।।५।।
तुकड्यादास म्हणे निववा मन, द्या चरणी मज थार ।।६।।