हरिविण चित्त उदास, गड्या रे ! हरिविण

(चाल: मनमोहन येणार राधिके...)
हरिविण चित्त उदास, गड्या रे ! हरिविण 0।।धृ०।।
गमे पाहता सृष्टि - सुखाला,वाटति है गळफास । गड्या रे ! ।।१।l
दव पळे रानीवनि सगळा, न सुटे त्याचा ध्यास । गड्या रे ! ।|२।।
कोणि तरी मिळवा मज त्यासी, होइन तुमचा दास । गड्या रे ! ।।३॥
तुकड्यादास म्हणे हतभागी, होवो हरि- रुपि वास । गड्या रे ! ।।४।l