दाखवि अपुले तीर, नर्मदे !
(चाल: मनमोहन येणार राधिके.)
दाखवि अपुले तीर, नर्मदे ! दाखवि अपुले 0।।धृ०।।
फिरता श्रमला जीव भवी या, लावु नको ग उशीर । नर्मदे ! ।।१॥
नाहि भरवसा दो दिवसांचा, दे मनि माझ्या धीर । नर्मदे ! ।।२॥
तव स्नाने पापी मन उजळे, भेट देइ रघुवीर । नर्मदे ! ।।३॥
तुकड्यादास म्हणे करुणा घे, होउ नकोस बधीर । नर्मदे ! ॥४॥