गर्जतसे महावीर गिरीवर

(चाल: गावो रिथ सिथ मंगल.. )
गर्जतसे महावीर गिरीवर, अमृतवल्ली   मागे   रघुविर llध्रु०।।
लक्षमणाच्या शक्तीस्तव मी, आलो वृक्षांनो ! या या वर ।।१।।
रात्र निधे जरि जाइल प्राणचि, कोपतील आम्हावरि श्रीधर ।।२।।
आत्म- बले वचने रामाच्या, करतळि उचलत जो द्रोणागिर ।।३॥
धैर्य असे ज्या नामप्रतापे, भक्त खरा   हनुमंत   मुकुटवर ।।४।।
तुकड्यादास म्हणे मी नमतो, मारुतिच्या चरणास निरंतर ।।५।।