राधा -रमणविहारी मुकुंदा !

(चाल: गावो रिध सिध मंगल.)
राधा-रमणविहारी मुकुंदा ! चित्त तुझीया  लागो   छंदा ।।धृ०।।
मोर - मुकुट   पीतांबरधारी ! नंदन - नंद   सुरेश्वर - वंदा ! ॥१॥
अधरी धरी पावा गोपाला ! गोपि - हृदय आनंदा - कंदा ! ।।२ll
ध्याति सदा जे योगिमुनीश्वर, देत सुखाचा अविचल धंदा ! ll३ll
तुकङ्यादास म्हणे आवडला, मम हदयासनिच्या आनंदा ! ll४।।