विघ्न -विनाशक नाम हरीचे

(चाल: गावो रिथ सिध मंगल...)
विघ्न-विनाशक नाम हरीचे, सोड नको मनुजा ! अधरीचे llध्रु०।।
काम करित तरतील भवातुनि, जे जन स्मरति सदैव दुरीचे ॥१॥
मन्मानस - मंदीर सुशोभित, हृदयासनि बसवीत उरीचे ॥२॥
मोक्ष-सुखाचा ठावच पावे, काम न काहि मुळीच दुरीचे ॥३॥
चित्त अखंडित हरिच्या स्मरणी, होत शरिर वैकुंठ-पुरीचे ॥४॥
तुकड्यादास म्हणे स्मर प्राण्या ! येइल अंति विमान वरीचे ॥५॥