चल ये, चल ये रे, गिरिधारी

(चालः गावो रिध सिध मंगल )
चल ये, चल ये रे, गिरिधारी ! मनमोहन राधा- मनहारी ! ॥धृ।l
तुजवाचुनिया जीव उदासी, ओस दिसे दुनिया ही   सारी ।।१।।
न गमे, न रमे यमुनेकाठी भेट सख्या ! अजि कुंज-विहारी !॥२।।
विरह असा हा ना सोसवतो, लागलिसे जिवभावा   तारी ।।३॥
तुकड्यादास म्हणे घाबरलो, शांतवि चित्त अता कंसारी ! II४॥