चला या, सृष्टि सुखाने पाहु, मनि श्रीहरिला ध्याऊ

(चालः पुजारी मोरे मंदिरमो..)
चला या, सृष्टि सुखाने पाहु, मनि श्रीहरिला ध्याऊ ।।धृ०॥
एकचि जीव जगी दिसती हे, प्रणयसुखे नाना नटती हे ।
खेळ     तयाचा      दावु ।। चला या 0।।१।।
एक जिवावर नाना रचना, म्हणती कोणी काका, नाना ।
साळे,      जावई,    भाऊ।। चला या 0।।२|।
नटली देवी जीवरुपाने, म्हणती कोणी लक्ष्म सुखाने ।
आई, विहिण आणि जाउ । चला या 0।।३।।
त्यातचि साधू, त्यातचि भोंदू, पाहती तैसा घेती स्वादू ।
कर्मफळाचा          ठावु ।। चला या 0।।४।।
साक्षि अचल प्रभु एकचि राहे, नटती नटणे जीव सदा हे ।
रज्जुसर्पसम       न्यावु ।। चला या 0।।५।।
तुकड्यादास म्हणे प्रभु-माया, कळली प्रभुच्या निज भक्ता या।
तो   नटनाटक    ध्याऊ।। चला या 0 ।।६।।