करुणा कशी तुज ये ना ? मनमोहन, मेघश्यामा !
(चालः रमला कुठे ग कान्हा..)
करुणा कशी तुज ये ना ? मनमोहन, मेघश्यामा ! ॥धृ०।।
मन विटले संसारासी, रमला जिव तव पायाशी ।
मज भेट सख्या,श्रीरामा ! ।। मनमोहन 0 ॥१॥
तुजवाचुनि कोण अम्हाला ? देइल सुख, शांति जिवाला ।
तू भक्त - जनांचा प्रेमा ! ॥ मनमोहन 0।l२l।
तू कल्पद्रुम भक्तांचा जिवभावच वीरक्तांचा ।
येतोस तयांच्या कामा ll मनमोहन 0।।३।l
चमकु दे मुकुट मोरांचा, ध्वनि ऐकू दे बंसीचा ।
तुकड्याला ने तव धामा।। मनमोहन0।।४।।