का अजुनी तुज नये दया बा श्री पांडुरंगा !

(चाल: कसा निभवसी काळ..)
का अजुनी तुज नये दया बा श्री पांडुरंगा  ! ।
फार अभागी मी बा ! म्हणुनी का धरिसी रागा ? ॥धृ०॥
माय बाप की बहिण जिव्हाळा तुजविण कोण विठू ! मजला ?
तारक चरण सोडूनी हे गा ! शरण जाउ मी कवणाला  ! ।। १।।
बहु हएराधी हरी ! तुझा मी, जगपालक तू जगजेठी !
कोलि तारिला, अजामेळ ही, आणिक भक्त बहू सृष्टी ॥२॥
महानष्टही भवपूर तरुनी जाती करुनी तव स्मरणा ।
तुकड्यादास हाचि वर मागे, ठाव देइ मजला   चरणा l।३॥