जातीचा हीन देवा ! मी जन्मलो कसा ?

(चालः हरिभक्त लाडका हरिचा..)
जातीचा हीन देवा ! मी जन्मलो कसा ?
सोडुनिया नीति मागे की जाहलो पिसा ॥धृo।।
मायबाप गांजिती हे, कुणि पदरी ना धरी ।
येउनिया श्रीहरी गा ! मज तू कृपा करी ।।१।।
नेणे मी ज्ञान काही, बुध्दीही ना वसे ।
झालो मी भ्रांत देवा ! हे मन फिरे   कसे ।।२॥
गुण नाही थोर अंगी, ना कर्मी थोरवी ।
तुकड्याला ठाव देई, मग भीति ना भवी ।।३॥