तव स्वरुपाचा करिता आठव मानसपण भूलते ।

(चालः पतीतपावन नाम ऐकुनी...)
तव स्वरुपाचा करिता आठव मानसपण भूलते ।
मार्ग कळेना जाया तेथे,    म्हणुनी    तळमळते ॥धृ०॥
काय कुठे तु कैसा भरला ? मज दावी स्वरुपा ।
दैव खरे पण कर्मचि दुबळे, काय    करु   बापा ! ॥१॥
संत वाद हा ऐकुनि मन हे धावे तुजपाशी ।
दैव जोर तो नावरतो गा !   काय   करु   यासी ? ॥२।।
लीन नम्र पामरा अधारु दे आता अपुला ।
तुकड्यादास तुझ्या स्वरुपाविण बा ! वाया गेला ।।३।।